Posts

Showing posts from June, 2017

..बाकी दुनिया सारी निखळ आभासी

Image
..बाकी दुनिया सारी निखळ आभासी  बाजारू जगण्यातली हरपलेली माणुसकी  जगण्यातले समाधान श्रीमंतीत पहातेय   त्या धनाच्या हवाश्यापायी आज मनातल्या आपुलकीला विसरतेय  स्वतःला सिद्ध कराया किती धावशी  कितीही धावला तरी आधाशीच राहाशी  जगण्यातलं मृत्यू हेच अंतिम सत्य  बाकी दुनिया सारी निखळ आभासी    जगण्याच्या मार्गी हवा प्रेमाचा हमरस्ता  पुन्हा कशाला खातो पश्चात्तापाच्या खस्ता  आपुलकी, प्रेमाची करा मुक्त उधळण  सुखसमाधानाच हाच मार्ग सस्ता  धनंजय गुंदेकर 9689043949 प्रेम, आपुलकी, सुख समाधान जगताना महत्वाचे आहे. संपत्ती तर कितीही कमावता येते, आपल्या उत्तरार्धात प्रशिध्दी, पैसा निरर्थक आहे. जीवन जगतानाच सुखी समाधानी जगण्यास प्राधान्य द्यायला हवे! दुसऱ्याला दिलेल्या समाधानातून आत्मिक सुखाची वृद्धी होते .......